Just another WordPress site

साकळी जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ जुलै २५ सोमवार

तालुक्यातील साकळी गावाजवळ काल दि.२७ जुलै रविवार रोजी यावल-चोपडा राज्य महामार्गावर सायंकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एक जणाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की,राजेन्द्र रमेश सपकाळे वय ४५ वर्ष राहणार वढोदा तालुका यावल हे साकळी गावाकडून वढोदा गावाकडे आपल्याकडील एमएच १९ई बि ५४४२ या मोटर सायकलने येत असतांना वसंत महाजन यांच्या जिनिंग जळील पुलाच्या वळणावर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांनी समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात यांचा जागीच मृत्यु झाला असुन तर दूसरा व्यक्ती हा गंभीर जखमी झाला आहे.यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून मयत राजेन्द्र सपकाळे यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले.अपघातात मयत झालेले राजु सपकाळे हे भाजपाचे कार्यकर्ते व जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे यांचे भाचे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.