१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरील शेतकरी जनआक्रोश मोर्चा नियोजनाबाबत यावल येथे बैठक संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ सप्टेंबर २५ रविवार
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१७ सप्टेंबर २५ बुधवार रोजी शिवतिर्थ मैदान पासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणाऱ्या पक्ष विरहीत शेतकरी आक्रोश मोर्चात मोठया संख्येत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत माजी खासदार व उबाठाचे पदाधिकारी उन्मेश पाटील यांनी यावल येथे संपन्न झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी बांधवांच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
या बैठकीला माजी आमदार रमेश चौधरी,यावल माजी पंचायात समिती गटनेता शेखर पाटील,शिवसेना उबाठाचे योगेश चौधरी,यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शरद कोळी,संतोष खर्च,सारंग बेहडे,गुणवंत चौधरी,सुरेश तळेले,संजय करांडे यांच्यासह विविध समाजसेवी संघटनाचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले,साकळी सरपंच दिपक पाटील,भगतसिंग पाटील,कमलाकर पाटील,ज्ञानेश्वर पाटील,अशोक बारी,जितेन्द्र देशमुख यांच्यासह मोठया संख्येत पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी वर्ग बैठकीत उपस्थित होते.