Just another WordPress site

QR कोड नसलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या समस्येवर तोडगा काढा !! नगराध्यक्षा छायाताई पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ जुलै २६ बुधवार

पूर्वीच्या काळात यावल नगरपरिषदेकडून जारी करण्यात आलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांवर QR Code उपलब्ध नसल्यामुळे तसेच जुन्या नोंदवह्या जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना नवीन दाखले मिळवण्यात व विविध कामांमध्ये ऑनलाइन पडताळणी करताना मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या समस्येवर तातडीने प्रशासकीय व तांत्रिक तोडगा काढून मार्गदर्शन करावे अशी आग्रही मागणी यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.​नगराध्यक्षा छाया पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार,पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या नियमांनुसार जारी करण्यात आलेल्या दाखल्यांवर QR कोड नसे.मात्र सद्यस्थितीत विविध शासकीय व खासगी कार्यालयांकडून ऑनलाइन QR कोडद्वारेच पडताळणीची अट घातली जात आहे.जुने दाखले कायदेशीररीत्या वैध असूनही ऑनलाइन पडताळणी होत नसल्याच्या कारणास्तव नागरिकांचे अर्ज वारंवार नाकारले (Reject) जात आहेत.

​नागरिकांना शैक्षणिक,बँकिंग व शासकीय कामांत अडचणी

​नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या जन्म-मृत्यूच्या मूळ नोंदवह्या (Registers) काळाच्या ओघात जीर्ण झाल्या आहेत.बऱ्याच प्रकरणांमध्ये नागरिकांकडे मूळ दाखला उपलब्ध नसतो अशावेळी नोंदवहीतील नोंदींच्या आधारे नवीन दाखला देताना QR कोड नसणे,ऑनलाइन पडताळणी न होणे आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ,शैक्षणिक प्रवेश,न्यायालयीन कामे,बँकिंग व इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.​Qसदरहू R कोड नसलेल्या जुन्या दाखल्यांना वैध मान्यता मिळावी व जुन्या दाखल्यांना वैध मानण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत,​जीर्ण नोंदींच्या आधारे नवीन दाखले,जीर्ण नोंदवह्यांमधील नोंदींच्या आधारे नवीन दाखले निर्गमित करण्यासाठी सोपी व स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी,​ऑनलाइन पडताळणीतील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात,​नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी अपेक्षा नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.