Just another WordPress site

यावल येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३५० प्रकरणे मार्गी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २५ रविवार

येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत जमीन महसूल व थकबाकी वसुलीसाठी मंडळ निहाय नियोजन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिस्कर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जमीन महसूल व आर आर सी थकबाकीदार यांचा चांगला प्रतिसाद मिळला.

यावेळी निवृत्ती गायकवाड,प्रभारी उप विभागीय अधिकारी फैजपूर यांचेसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे आणि नायब तहसीलदार बी एम पवार,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.या न्यायालयाच्या आवारात संपन्न झालेल्या लोकअदालती मध्ये एकुण ३५० प्रकरण मार्गी लावण्यात येवून यात ४ लाखहून रकमेचा महसुली कर वसूल करण्यात आला.या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी यावल तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष अॅड गोविंद बारी,अॅड नितिन चौधरी,अॅड अशोक सुरडकर,अॅड.रियाज पटेल यांच्यासह महसुलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.