Just another WordPress site

संजय गांधी व श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांनी ३० जुनपुर्वी हयातीचा दाखला सादर करावा !! तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ जून २६ शुक्रवार

तालुक्यातील केन्द्र व राज्यशासन पुरस्कृत संजय गांधी,श्रावणबाळ,इंदीरा गांधी योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी ३० जुनपुर्वी आपल्या हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असल्याने सदर लाभार्थ्यांनी सदरील मुददित आपला हयातीचा दाखला काढून घ्यावा.सदरहू जे लाभार्थी आपला हयातीचा दाखला सादर करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचा लाभ बंद होऊ शकतो.तरी सदरील लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला काढून घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व संगोयो विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी केले आहे.

दरम्यान केन्द्र शासन पुरस्कृत योजने अंतर्गत इंदीरा गांधी,राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना तसेच सामाजीक न्याय विशेष सहाय्य अंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सत्यापन अॅप व्दारे लाभार्थ्यांनी हयात असल्याचा डिजिटल लाईव्ह सर्टीफिकेटस ऑनलाईन पध्दीने करून घ्यावयाचे आहेत.लाभार्थ्यानी याकामी गावपातळीवर आपले सरकार सेतू सुविधा केन्द्र,ग्राम महसुल अधिकारी,महसुल सेवक यांना सदरचे काम करून घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहे.तरी सर्व योजनेच्या लाभार्थ्यांनी दि.३० जुन २६ पुर्वी आपले डिजीटल हयातीचा प्रमाणपत्र सादर करणे शासनाने बंधनकारक केले आहे.तरी वरील शासनाच्या उपरोक्त योजनेचा योजनांचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी यावल तहसील कार्यालयात सादर करावे असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व संगोयोचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.