यावल तालुक्यात वादळाच्या तडाख्यात केळी बागा जमीनदोस्त !! आ अमोल जावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला आदेश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ जून २६ सोमवार
तालुक्यात शनिवार दि.६ जून २६ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून आमदार अमोल जावळे यांनी पाहणी करून तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित महसूल प्रशासनाला आदेश दिले आहे.
भुसावळ रस्त्यावर आणि फैजपूर रस्त्यावर दोन दोन वृक्ष कोसळल्याने रहदारी काही काळ बंद पडली होती.तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला रस्त्यातून वृक्ष बाजूला हटवण्यासंबंधी सूचना केल्यावर रहदारी मोकळी झाली.वडोदे प्रसावदा येथील शिवरात सर्व्ह लाईट इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील संपूर्ण पत्र वादळामुळे उडून गेले.सध्या सुट्टी असल्यामुळे विद्यार्थिनी येथे नव्हते त्यामुळे जीवित हानी टळली.राजोरा शिवारात तसेच राजोरा शिवारात सतीश रूपचंद पाटील यांच्या शेतातील ५००० केळीचे झाडे वादळामुळे जमीनदोस्त झालीत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात.सांगवी,राजोरा,पिंपरूड,वढोदे प्र.सावदा या गावांमध्ये वादळाचा फटका बसलेला असून यावल विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देऊन तहसीलदार मोहनमाला पंचनामे करण्याचे सांगितले.त्यानुसार काल दि.७ जुन रोजी आमदार अमोल जावळे यांच्यासोबत तहसीलदार मोहनमाला नाझिरकर राजोरे,वढोदे प्रगणे सावदा,अंजाळे या परिसरातील वादळामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत अंजाळे,फैजपुर,राजोरा व पिंपरुड तलाठी उपस्थित होते.