Just another WordPress site

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत कर्मयोगी कार्यशाळा समारोप उत्साहात !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २५ रविवार

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रमाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेचे उदघाटन मिनल करणवाल (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जि..जळगाव यांच्या हस्ते दि.९ सप्टेंबर २५ रोजी करण्यात आले.सदरील कार्यशाळा नियोजन समिती सभागृह जळगाव या ठिकाणी दि.९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २५ या कालावधीत घेण्यात आले.या अभियानाचा मुख्य उद्देश समर्पण,सेवा आणि संकल्प या तीन त्तवावर आधारीत देशामध्ये २० लाख परिवर्तनशील नेत्यांचा समूह तयार करणे आहे.आपला गाव समृध्दीचे स्वप्नया संकल्पनेवर आधारीत या उपक्रमातुन गाव पातळीवर विकासाची नवी दृष्टी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.कार्यशाळेचा उद्देश आदिवासी परिवर्तनासाठी व्यक्ती संस्थांना सक्षम बनविणे हा आहे असे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांनी मार्गदर्शनात मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमातून संपूर्ण सरकार दष्टीकोन या तत्वावर काम करुन सर्व विभागामध्ये समन्वय साधला जाईल यामुळे आदिवासी भागांच्या विकासाच्या भागाला गती मिळेल.जनजातीय कार्य मंत्रालय आदिवासी विकास नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सदरील कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस आरोग्य,शिक्षण,बांधकाम,महिला बालकल्याण,ग्रामविकास,कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन,सहकार,वनविभाग,यावल वनविभाग जळगाव वनविभाग आदिवासी या विभागातील तालुका स्तरावरील आधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता.या कार्यशाळेचे प्रस्ताविक प्रशांत माहुरे सहायक प्रकल्प अधिकारी यावल,संचालन अजित जमादार कनिष्ट अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि.प.रावेर यांनी केले. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदि कर्मयोगी अभियान तथा कार्यशाळा घेण्यात आलीश्री फिरके साहेब TRTI पुणे हे राज्य मास्टर ट्रेनर म्हणुन आदि कर्मयोगी कार्यशाळास पुर्ण वेळ उपस्थित होते व त्यांनी दि.९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २५ या कालवाधीत आदि कर्मयोगी कार्यशाळेमध्ये BMT अधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.त्यांनी संकल्प,सेवा,समर्पण आदिवासी समाजात गावपातळीवर तळागाळातील नेतृत्व तयार करणे,गतिमान प्रशासन उभारणे आणि विभागातील सहभाग समन्वय आदिवासी समाजात परिवर्तन करणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातर्गत जळगाव जिल्हयातील ११२ गावांचा समावेश करण्यात आला असून सदरील धरती आबा ग्रामउत्कर्ष अभियानाशी आदि कर्मयोगी अभियान जोडण्यात आले आहे.सदरील कार्यशाळेत प्रशिक्षण दिलेल्या तालुका मास्टर ट्रेनरर्स हे तालुका स्तरावर अशा प्रकारचे कार्यशाळा आयोजित करणार आहे.सदरील कार्यशाळेत ग्रामस्तरावरील किमान २० आदि सहयोगी आदिसाथी उपस्थितीत राहणार आहे.सदरील तालुका स्तरावरील कार्यशाळेमध्ये आदि कर्मयोगी,अधिकारी कर्मचारी,आदि सहयोगी आदि साथी यांना ग्राम विकास आराखडा तयार करण्यासंबंधाने मार्गदर्शन करणार आहे.त्यानंतर तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष गावात जाऊन शिवार फेरी काढतील आणि गावाचा ग्राम विकास आराखडा त्याच दिवशी तयार करतील आणि येणाऱ्या ०२ ऑक्टोबर २५ रोजी सदरील ग्राम विकास आराखड्यास मंजूरी देण्यात येईलवरीलप्रमाणे जिल्हास्तरीय कार्यशाळेचा समारोप मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.सदहुन कार्यशाळेत मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हास्तर तालुकास्तर अधिकारी व कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी आदि कर्मयोगी होणे ही एक सातत्यपूर्ण प्रकिया आहे या प्रकियेतून आदिवासी समाजात गाव पातळीवर तळागळातील नेतृत्व तयार करणे,गतिमान प्रशासन उभारणे आणि गावकऱ्यांच्या सहभागातून आदर्श ग्राम विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.गावाच्या सर्वागीण प्रगतीसाठी सर्व विभागाच्या सहभाग आणि समन्वय अत्यंत महत्वाचा आहे.आदि कर्मयोगी,आदि सहयोगी आणि आदिसाथी या तीन स्तरावरील व्यक्तींच्या क्षमता बांधणीमूळे गाव विकासाची प्रकिया अधिक सुलभ होईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलेया कार्यशाळेस जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स (DMT) प्रशांत माहुरे सहायक प्रकल्प अधिकारी,यावल अजित जमादार,डॉ.प्रमोद पांढरे,अभिनव माळी,बावीस्कर,अरुण साळुखे,महेश पाटील, ज्ञानेश्वर कुमावत,रोहन महाजन,तुषार पाटील,धर्मराज पाटील यांनी कार्यशाळेत प्रशिक्षण दिले अशी माहिती अरुण पवार प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल,जि.जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.