Just another WordPress site

“इंडिया फॅशन आयकॉन” प्रवेशिका नोंदणीकरिता महाराष्ट्रातील मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशियन यांना प्रवेशासाठी आवाहन !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० सप्टेंबर २५ शनिवार

रिसील डॉट एन या महाराष्ट्रातील नावाजलेल्या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्वात मोठा फॅशन शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या “इंडिया फॅशन आयकॉन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.सदरहू यावर्षी देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा या “इंडिया फॅशन आयकॉन” कार्यक्रमाचे आयोजन दि.८ ऑक्टोबर २५ रोजी नाशिक येथे करण्यात आलेले आहे.सदरील कार्यक्रमात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,वर्षा उसगावकर व प्रार्थना बेहेरे यांच्यामार्फत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना दिला जाणारा पुरस्कार हा कोणत्या अभिनेत्रीकडून स्वीकारायचा आहे याचे स्वातंत्र्य सहभागी स्पर्धकाला देण्यात आले असून पुरस्कार वितरण हे आपल्या ऐच्छिक सिने अभिनेत्रीच्या हस्ते स्वीकारण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहेहे विशेष !.

दरम्यान रिसील डॉट एन या नामांकित कंपनीच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फॅशन शो असलेल्या “इंडिया फॅशन आयकॉन” कार्यक्रमात महाराष्ट्रातील मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशियन यांना ट्राफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रमा दरम्यान व्हीआयपी पासेसची सुविधा आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.तसेच पुरस्कारा दरम्यानचे स्टार्ट टू एन्ड पर्यंतचे फोटो व व्हिडीओ हे सहभागी स्पर्धकाला कॉपी राईटायझेशन करून मिळणार आहे.परिणामी या माध्यमातून आपण सदरील अभिनेत्रींचे फोटो व व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करून आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी वाढविण्यास मदत होणार आहे.तरी महाराष्ट्रातील यशस्वी मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशियन यांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी केलेल्या स्पर्धकांनाच या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.सदरील नोंदणी ही २२ सप्टेंबर ते २  ऑक्टोबर या कालावधीत केली जाणार आहे.तरी सदरील नोंदणी करण्याकरिता एकता राख मो.नं – ७०६६७०४००२ व बाळासाहेब आढाळे मो नं – ८३२९४८१०५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.