Just another WordPress site

दिवाळीत खरेदी करण्यापूर्वी सावधान.. !! घातक तसेच बनावट व आरोग्यासाठी घातक मिठाई तसेच पदार्थ दुकानात येत असल्याची चर्चा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार

संपुर्ण देशभरात पुढील आठवडयापासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होणार असुन दिवाळी सण म्हटले म्हणजे घरांची रंगरंगोटी करणे,रोषणाईने सजावट करणे,लक्ष्मीपुजा करणे व एकमेकांना मिठाई घालण्याची तयारी सुरू झाली असून या दिवाळीच्या गोंधळात आपण भेसळयुक्त मिठाई पासुन सावध राहावे असा सल्ला जुन्या जाणत्या जाणकारांच्या माध्यमातून दिला जात आहे.

दिवाळी म्हटले की गोड पदार्थाची सरबत्तीच .. या दिवसांमध्ये मोठया प्रमाणात मिठाई खाल्ली जाते.यात मात्र काही मिठाईही आरोग्यासाठी धोकादायक देखील असु शकतात.दिवाळीच्या दिवशी नागरीक शेजाऱ्यांना व मित्रांना नातेवाईकांना एकमेकांना शुभेच्छा देतात.दिव्यांचा सण म्हणुन ओळखला जातो.दिवाळी निमित्ताने मिठाई वाटण्याची परंपरा आहे.हे नाते गोड करण्याचे,कुटूंब आणि मित्रांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढवण्याचे प्रतिक म्हणुनही पाहीले जाते.पण अशा दिवाळी निमित्ताने बाजारात अनेक प्रकारच्या मिठाई भेसळ आणी जास्त साखर केलरीजमुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.दिवाळीत मिठाई खरेदीच्या गर्दीचा फायदा घेत मिठाई विकणारे अत्यंत धोकादायक असे बनावट खवा ६ दुधाऐवजी बटाटा,आयोडीन सिंथेंटिक दुध,युरीया डिटर्जन अशा घातक पदार्थ भेसळ करून बनावट मिठाई बाजारात विक्रीला आणली जाते अशा पदार्थाने तयार केलेली मिठाई खाल्याने मृत्यु देखील होवु शकतो.दरम्यान अशी मिठाई खरेदी करतांना सावधानता बाळगावी असे आरोग्य तज्ञाकडून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.