Just another WordPress site

अंधारमळी येथील जिल्हा परिषद शाळेत जननायक बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी !!  

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ नोव्हेंबर २५ रविवार

तालुक्यातील सातपुड्याच्या वनराईत वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या अंधारमळी (ता रावेर) येथील जिल्हा परिषद शाळेत काल दि.१५ नोव्हेंबर शनिवार रोजी जननायक बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आदिवासी वेशभूषा करून तसेच विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सेवाजेष्ठ ग्रामस्थ बशीर मयबूब तडवी व गफूर रमजान तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी फैजान फिरोज तडवी ४ थी,तमन्ना रुखमान तडवी ३ री,आवेश आरिफ तडवी थी,रिशान लतिफ तडवी ४ थी,अजर शरीफ तडवी री या विद्यार्थ्यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर आधारित मनोगत व्यक्त केले.तर तमन्ना रुखमान तडवी,आसमा मेहरबान तडवी,नाजमिन सुपडू तडवी,आलिया तडवी,मन्नत लतिक तडवी,रिशान लतीफ तडवी,फैजान फिरोज तडवी,साबीर मुस्तुफा तडवी,अजर शरीफ तडवी,आलिया अरमान तडवी व आवेश आरिफ तडवी या बालविद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करीत अनेकांची मने जिंकून कार्यक्रमात रंगत आणली.यावेळी सलिम शामत तडवी ग्रा.पं.सदस्य अंधारमळी,हमीदा जुम्मा तडवी ग्रा.पं.सदस्या,अंधारमळी,गुलशान कलिंदर तडवी ग्रा.पं.सदस्या अंधारमळी,रमजान अहमद तडवी पोलिस पाटील अंधारमळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सलिम बाबू तडवी,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष छब्बीर बशीर तडवी,हबीब लालखाँ तडवी,रमजान मयबू तडवी,नबाब बिऱ्हाम तडवी,गुलशेर इस्माईल तडवी,मुस्तुफा हाफिज तडवी,फिरोज गफूर तडवी,आरिफ गफूर तडवी,फरिद गफुर तडवी,शरिफ बशीर तडवी,हुसेन मयबूब तडवी,सुपडु रुबाब तडवी,  लुकमान निजाम तडवी,छब्बीर उस्मान तडवी,लुकमान लतिब तडवी,नसिर निजामग्रा.पं.शिपाई,उषा फिरोज तडवी अंगणवाडी सेविका,जोहरा फरिद CRP अंधारमळी,मुख्याध्यापक शेखर बसारत तडवी,उपशिक्षिका मिना तडवी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.