यावल नगरपालीकेत शिवसेना उबाठाने भाजपाला पराभूत करून मिळवलेले विजयाचे यश हे राज्याचे लक्ष वेधणारे : गुलाबराव वाघ !!
यावल ( प्रतिनिधी ) नगर पालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सौ छाया अतुल पाटील यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणारे विजय मिळवले असुन, येणाऱ्या काळात शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातुन यावल शहराच्या सर्वांगीण विकासा साठी बांधील राहणार असल्याचे विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा चे जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले.
दरम्यान निवडणुकीत काही पक्षातील गद्दारांनी दगा फटका केल्याने दोन उमेदवारांचा अल्पमतांनी पराभव स्विकारावा लागला अशा गद्दारांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात व या बाबत चा माहीती अहवाल आपण वरिष्ठांना पाठवत असल्याचे जिल्हा प्रमुखांनी सांगितले . यावेळी निवडणुकीत पक्षाच्या वतीने सौ छाया पाटील यांनी भाजपाच्या उमेदवार यांचा दणदणीत पराभव करून विजय संपादन केल्याबद्दल सौ छाया पाटील यांचा आणी शिवसेना उबाठाचे विजयी झालेले नगरसेवक सागर चौधरी व नगरसेविका निलेश बारी यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील व गोपाळ चौधरी, शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपप्रमुख संतोष खर्च, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कडू पाटील याप्रसंगी उपस्थित होते . यावल येथे पाटील यांच्या फार्म हाऊस वर संपन्न झालेल्या सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन जगदीश कवडीवाले यांनी केले .