मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २५ रविवार
महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे व यासाठी जागावाटप कसे होणार याचा पेच कायम होता तो सुटल्यात जमा आहे कारण भाजपा १२९ तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ७९ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान २० जागांवर तोडगा निघणे बाकी आहे व जो आज निघेल अशी शक्यता आहे.अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढणार आहे मात्र अजित पवारांचा पक्ष १०० जागा लढवणार असल्याची माहिती आहे.जागावाटपाची चर्चा झाली आहे व भाजपा १२८ जागा आणि शिवसेना ७९ जागा अशा २०७ जागांवर एकमत झाले आहे उर्वरित २० जागांवर चर्चा सुरु आहे व या जागांवरही लवकरच तोडगा काढण्यात येईल असे अमित साटम यांनी म्हटले आहे.
दरम्यान २२७ जागांवर महायुतीचे उमेदवार लढणार आहेत तसेच आम्ही १५० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मुंबईत महायुतीचा महापौरच होईल
शिवाय जागावाटप आणि वाटाघाटी या दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच होईल असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.भाजपा शिवसेनेची एकत्रित बैठक पार पडली,जनसभा नियोजन आणि संयुक्त सभा,जागावाटपाची ही चर्चा झाली.भाजपा १२८ जागा,शिवसेना ७९ जागा अशा २०७ जागांवर एकमत झालेला आहे उर्वरित २० जागांची चर्चा सुरू असून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल.समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून उर्वरित जागांवर भाजपा लढणार की शिवसेना लढणार याचा निर्णय घेऊ अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी आमची महायुती तयार आहे.सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा देण्यात येतील.कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नाही,वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यादी जाहीर करू असेही अमित साटम यांनी म्हटले.दुसरे लोक काय करतात यावर आमचे निर्णय ठरतील तर निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या एकत्रित सभा होणार आहेत.त्यासाठी १ किंवा २ तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल असेही स्पष्ट करण्यात आले.ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली आहे मात्र जागावाटपावर त्यांचेही घोडे अडले आहे अशात महायुतीकडून जागावाटप स्पष्ट करण्यात आले आहे उर्वरित २० जागांवरही लवकरच तोडगा निघेल अशी चिन्ह आहेत.