यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० डिसेंबर २५ मंगळवार
येथील नगर पालीकेतील भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेवकांच्या सर्वात मोठ्या गटाच्या गटनेतेपदी प्रथमच निवडून आलेल्या नंदा राजेन्द्र महाजन यांची तर उपनेतेपदी माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
यावल नगर पालीकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ८ जागांवर नगरसेवक विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणुन भारतीय जनता पक्ष हे समोर आले असुन यात भारतीय जनता पक्षाच्या नगर पालीकेतील गटनेता पदावर कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यावेळी गटनेते पदासाठी दोन नांवाची चर्चा ही आघाडीवर होती अखेरीस आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शन सुचनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरपालीकेच्या गटनेतेपदी सौ नंदा राजेन्द्र महाजन यांची उपगटनेतेपदी यावल नगर पालीकेच्या माजी प्रभारी नगराध्यक्ष पदाची धुरा काही काळ सांभाळणारे व विद्यमान नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांची निवड करण्यात आली आहे.नगरसेविका सौ नंदा राजेन्द्र महाजन यांची गटनेतेपदी व उपगटनेतेपदी राकेश मुरलीधर कोलते यांची निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने या दोघांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.