Just another WordPress site

यावल नगरपालीका विषय समिती सभापती निवडीत सत्ताधाऱ्यांना तीन तर भाजपा व राष्ट्रवादीला दोन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ जानेवारी २६ सोमवार

येथील नगर पालीकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत आज विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या सत्ताधारी गटाला तिन समित्यांचे सभापतीपद मिळाले तर भाजपा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ३व १ अपक्ष नगरसेवक एकत्र आल्याने नगरसेवकांची संख्या समसम्मान झाल्याने सर्व समितींंच्या सभापतीची निवड ही ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली व यात राष्ट्रवादी व भाजपाच्या गटाला दोन सभापतीपदे मिळाली आहेत.

दरम्यान आज दि.१९ जानेवारी सोमवार रोजी पिठासीन अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी निशीकांत गवई व सह मुख्यधिकारी रविकांत डांगे यांच्या प्रमुख उपस्थित तसेच यावल शहराच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील,उपनगराध्यक्ष सईदा बी याकुब शेख यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या उपस्थित यावल नगर पालीकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा संपन्न होवुन विषय समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली.दरम्यान स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्याकडे सहा पैक्की चार सदस्य असल्याने त्यांचे वर्चस्व राहणार असुन उपनगराध्यक्ष सईदा बी शेख या स्वच्छता वैधक आणी सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती असतील तर पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी इमाम खान समिर खान,स्वच्छता वैधक आणी सार्वजनिक आरोग्य समिती,शिक्षण,क्रिडा,सांस्कृतीक कार्य समितीच्या सभापतीपदी पराग विजय सराफ तर बांधकाम नियोजन आणी विकास समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी (अप)च्या अंजुम बी कदीर खान यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी (अप) अमिनाबी शाकीर खान यांची निवड करण्यात आली आहे.सदर सभापती निवडीनंतर विविध विभागाच्या माध्यमातुन शहरातील विविध प्रलंबित विकास कामे व समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा नवनियुक्त सभापती यांच्याकडून शहरातील नागरीक व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.