Just another WordPress site

यावल आगार प्रवाशांच्या सोयीसाठी सदैव तत्पर राहील !! नवनियुक्त आगार व्यवस्थापक ईम्रान पठाण यांची स्पष्टोक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० जुलै २६ गुरुवार

प्रवाशांच्या मागणीला व गैरसोय तसेच अडचणींना प्रथम प्राधान्याने सोडवा कारण प्रवाशी आहे म्हणुन एसटी (लालपरी) आहे हे विसरता कामा नये परिणामी आपण प्रवाशी व नागरीकांच्या सेवेसाठी सदैव शिस्तीने तत्पर राहावे असे आवाहन यावल एसटी आगारात नव्याने रुजु झालेले एसटी आगार व्यवस्थापक ईम्रान पठाण यांनी आपल्या कर्मचारी व चालक वाहकांना केले आहे.

दरम्यान येथे मागील चार वर्षापासुन कार्यरत असलेले तत्कालीन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांची एरंडोल या ठिकाणी नुकतीच बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रावेर येथे कार्यरत असलेले ईम्रान पठाण यांची यावल येथे बदली करण्यात आली असून त्यांनी यावल एसटी आगाराची सुत्रे स्विकारली असल्याची माहिती “पोलीस नायक ” न्यूज वृत्तवाहिनी बोलतांना इम्रान पठाण यांनी नुकतीच दिली आहे. इम्रान पठाण यांनी माहिती देतांना पुढे म्हटले आहे की,प्रवाशांच्या प्रश्नांना अग्रभागी घेतले असून आगारातील प्रत्येक कर्मचारी व चालक वाहक यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी शिस्तीने सदैव तत्पर राहावे तसेच जेष्ठ नागरीक महीला व विद्यार्थ्यांशी आपुलकी वागावे त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास दिल्या आहेत.तसेच आगारात मोठया प्रमाणावर असलेल्या नादुरूस्त वाहनांच्या प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगून अनेक लांब पल्यांच्या शेडूअलच्या मागण्या या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे.सदरहू आगारास नविन एसटी बसेस मिळाल्यास आपण त्याचा देखील पाठपुरावा करणार असल्याचे आगार व्यवस्थापन ईम्रान पठाण यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.