यावल तालुक्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर सर्व धरण व तलावस्थळी नागरीकांना सुरक्षेच्या दृष्टीने जाण्यास बंदी-तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले पत्रक जारी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २६ शुक्रवार
मान्सूनच्या काळातील अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन मोहनमाला नाझीरेरकर तहसीलदार यावल तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासुन पाऊसाने दमदार हजेरी लावली असुन सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाली आहे.परिणामी या पार्श्वभुमीवर महसुल प्रशासनाने १ जून २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६या मान्सूनच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे तलाव,धरण,पाट यांमध्ये अचानक पाणी सोडले जाते.पाऊस पडल्यावर धरण,नदी,तलाव याठिकाणी नागरिकांची गर्दी होते त्यामुळे अपघात/दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.सदरहू या कोणत्याही ठिकाणी जाण्यास मनाई असून पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी नागरिकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान निंबा देवी धरण,वाझडिसरा तलाव,वड्डी धरण,मोर धरण,हरीपुरा धरणासह यावल येथील पाटचारी यावल येथील तलाव शेळगाव बॅरेज या ठिकाणी कोणी नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.जीवित आणि प्राणी हानी टाळण्यासाठी मान्सूनच्या ५ महिन्यांसाठी यावल तालुक्यातील धरणे आणि तलाव परिसरात नागरीकांना जाण्यास बंदी करण्यात येत असल्याचे पत्रक तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी काढले आहे.