पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका लांबणीमुळे ग्रामस्थांच्या समस्या व विकास कामे टांगणीवर !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ ऑगस्ट २६ गुरुवार
लोक प्रतिनिधी अभावी प्रशासनातील अधिकार्याचा मनमानी कारभार व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्या पासुन तर इतर विभागातील अधिकारी हे पाहुण्यांसारखे कार्यालयात हजेरी लावुन निघून जात असल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या व अडचणी कशा सुटणार ? असा प्रश्न ग्रामीण क्षेत्रातल्या नागरीकांना पडला असून याकडे कुणी लक्ष देईल का ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षा पासुन पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी काही ना काही कारणाने अडकुण पडल्या असुन या निवडणुकीत निवडून दिलेला आपला प्रतिनिधी आपल्या समस्या व अडचणी प्रश्न सोडवितो असा विश्ववास नागरीकांना आहे.पण मागील पाच वर्षापासुन पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकी वारंवार लांबणीवर जात असल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांमध्ये प्रशासनाच्या वेळ काढू कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामस्थांना आपल्या समस्या व प्रशासकीय कामांसाठी वारंवार पंचायत समितीचे हेलपाटे खावे लागत असून तरी देखील त्यांची महत्वाची कामे होत नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना आपल्या समस्या व अडचणींची जाण असलेला आपल्या हक्काचा लोक प्रतिनिधी पाहीजे व या करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी हाच एक पर्याय असल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.