Just another WordPress site

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री मनुदेवी मंदीरातील १ लाख ५० हजार रुपयांची चोरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ ऑगस्ट २६ रविवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या प्रसिद्ध श्री मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार व गाभाऱ्याचा दरवाजाचे कूलुप व कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून मनुदेवी व बाजूस असलेल्या रेणुका देवी मूर्तीचा मुकुट व छत्री अज्ञात चोरट्यांनी दि.६ व ७ चे रात्रीच्या वेळी यात वेळ नक्की नसून या कालावधीत चोरी झाले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.याबाबतची तक्रार यावल पोलीस ठाण्यात दिले वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद मनुदेवी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी दिली आहे असून फिर्यादीत म्हटले आहे की,नेहमी प्रमाणे रोज सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही प्रमुख प्रवेशद्वार व गाभाऱ्याचे दरवाज्यांना कुलप लावून घरी निघून जातो.यावेळी रात्रपाळीकरिता पहारेदार म्हणून सखाराम बारेला हा काम पाहात असतो. सखाराम बारेला हा मंदिराच्या वरच्या बाजूस झोपलेला होता.मंदिराच्या बाजूला धबधबा आहे.धबधब्याच्या आवाजात चोरट्यांनी हा प्रकार घडवून आणला असावा आणि दोन मुकुट,दोन चांदीच्या छत्र्या असा सरासरी मुकुट चाळीस हजार पाचशे रुपयात किमतीचा व ३०० ग्रॅम वजनाची छत्री सत्तावीस हजार रुपये किमतीची तसेच २०० ग्रॅम वजनाची रेणुका देवी माता मंदिर व मनुमाता मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट असे सुमारे एक लाख पन्नास हजाराचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडीकोंडे तोडून आत प्रवेश करून चोरीस नेले आहेत.शिवाजी प्रभाकर पाटील राहणार आडगाव तालुका यावल यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असून सध्या मंदिरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे असे भाविक भक्तांकडून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.