यावल पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली न झाल्यास १५ ऑगस्ट पासुन उपोषण !! कोरपावली प्रशासक तथा सरपंच विलास अडकमोल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ ऑगस्ट २६ गुरुवार
येथील पंचायत समिती येथे घरकुल विभागमार्फत तालुक्यातील खेड्यापाड्यातील घरकुलाचे लाभार्थी यांच्या हप्ते तसेच जिओ टॅंकचे फोटो यासाठी आठ-नऊ महिन्यांपासुन खात्यावर पैसे येत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून यावल पंचायत समिती मधील कंत्राटी कर्मचारी म्हणुन कार्य करणारे संगणक चालक व अभियंता यांच्या गोंधळलेल्या कारभारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सदरहू कोरपावली प्रशासक सरपंच विलास अडकमोल यांनी या दोघांच्या तात्काळ बदली करण्याची मागणी केली असुन बदली न झाल्यास १५ ऑगस्ट २६पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार निवेदनाव्दारे दिला आहे.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना दिलेल्या तक्रार निवेदनात माजी सरपंच व प्रशासक सरपंच विलास अडकमोल यांनी म्हटले आहे की,शासनाच्या वतीने मिळणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व शासनाकडून मिळणारे लाभआपल्या खात्यात जमा व्हावे यासाठी लाभार्थीयांना यावल येथे आपले रोज भाग बुडवून वारंवार चकरा मारावा लागत आहेत.तरी यावल तालुक्यात मोठा शेतकरी कर्मचारी वर्ग आहे तरी सुध्दा यावल पंचायत समितीचे घरकुल ऑपरेटर व ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांच्या संगनमताने या वर्गास खूप चकरा माराव्या लागत आहेत.या तक्रारी गट विकास अधिकारी यांच्याकडे कोरपावली माजी सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी वेळोवेळी तोंडी तसेच लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे पंचायत समिती यांच्याकडून न मिळाल्याने तसेच १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत यावल पंचायत समितीतील कंत्राटी घरकुल संगणक डाटा चालक कर्मचारी जावेद तडवी व तसेच गृहनिर्माण अभियंता हर्षल पाटील यांची बदली न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने पंचायत समिती यावल येथे उपोषणाचे पत्र देण्यात आले आहे.