Just another WordPress site

धरती आबा ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत केंद्रात शासकीय योजनांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर थेट मांडता येणार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ ऑगस्ट २६ शुक्रवार

शासनाच्या वतीने धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी विशेष जनसुनावणीबद्दल जळगाव जिल्ह्यातील ११२ आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून धरती आबा ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत केंद्रात शासकीय योजनांच्या समस्या आता थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

दरम्यान शासनाच्या वतीने धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ११२ आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून सदर अभियानात दि.१३ ते १५ ऑगस्ट २६ या कालावधीत गावांतील आदिवासी सेवा केंद्रांमध्ये भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार जन सुनावणीचा मुख्य उद्देश,आदिवासी नागरिकांच्या शासकीय योजना,सेवा व सुविधांशी संबंधित,अडचणी प्रलंबित बाबी तसेच तक्रारी व मागण्या यांची थेट नोंद घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.सदर जन सुनावणीत ग्राम अधिकारी,आदिवासी सेवा केंद्रातील स्वयंसेवक,विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांकडून समस्या नोंद करून घेणे आणि त्यावर तात्काळ किंवा नियमानुसार कार्यवाही करणे,नागरिकांना संधी देऊन शासकीय यंत्रणांशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडता येणार आहेत.त्याचबरोबर ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत १५ ऑगस्ट शनिवार रोजीआदिवासी सेवा केंद्रांवर तिरंगा ध्वज फडकवणे,’सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सहभाग नोंदवणे तसेच संपूर्ण जन सुनावणीचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून आदि प्रसारण पोर्टलवर अपलोड केले जाणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. सदरहू या जनसुनावणीस शासनाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या ११२ गावातील नागरिकांनी होऊन सदरील संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर जिल्हा परिषद जळगाव आणि अरूण पवार,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.