पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे हि धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी या ठिकाणी घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.आठ महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आज करुण अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.