Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे.या अपघातामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला आहे.ही खाजगी आराम बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती.कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
या बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते.चालक जागीच ठार झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत.एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अपघात झाल्यानंतर देवदूत यंत्रणा,आयआरबी यंत्रणा,महामार्ग वाहतूक पोलीस,अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी,खोपोली पोलीस घटना स्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले आहेत.जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.