Just another WordPress site

यावल येथे शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ;शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादीत भरडधान्य मका,ज्वारी यांची केंद्र शासनाच्या किमान आधारभूत दरानुसार खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचा शुभारंभ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते येथील सातोद रोडवरील शासकीय गोदामात काटा पूजन करून करण्यात आले.यावेळी केंन्द्रात ज्वारी विक्रीसाठी प्रथमच आलेले कोरपावली येथील शेतकरी तुषार सुदाम नेहते यांचा तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी यावेळी केले.

शासकीय भरडधान्य खरेदीसाठी तालुक्यातील असलेल्या कोरपावली वि.का.संस्थेकडे यंदा ५३९ शेतकऱ्यांच्या १७ हजार ४५८ क्विंटल ज्वारी व ७० शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली आहे.येथील खरेदी केंद्रात यावर्षी शासनाने ज्वारीसाठी २४ हजार ७०२ क्विंटल तर मका खरेदीसाठी ८ हजार ४०० क्विंटलचे उद्दिष्ट दिले असून त्या तुलनेत शेतकऱ्यांनी कमी नोंदणी केल्याने उद्दिष्ट गाठता येणार नाही पण जर शासनाने धान्य खरेदीस मुदतवाढ दिल्यास सदरील उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल अशी माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी पत्रकारांना दिली आहे.भरड धान्यास शासकीय हमीभाव ज्वारी २ हजार ९७०,तर मका १ हजार ९६२ तर बाजरी २ हजार ३५० रुपये आहे. परिणामी याच धान्याची खुल्या बाजारात ४००-५०० रुपयांपेक्षा जास्त फरक दिसुन येत आहे.या कार्यक्रमास विविध कार्यकारी संस्था कोरपावली सचिव मुकुंदा तायडे,शेतकरी व या संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे,विकाचे संचालक वसंत नामदेव महाजन,वसंत भोसले,शेतकरी डॉ.निलेश गडे,शासकीय गोदाम किपर सुकलाल कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्ग मोठया उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.