जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या सणाला गालबोट लागले आहे.यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या हिंगोणे गावात पतंग उडवित असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सदरील घटना मकरसंक्रांती सणाच्या दिवशी रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.अक्षय संजय महाजन रा.कळमसरे ता.अमळनेर ह.मु.हिंगोणे ता.धरणगाव असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव असून सदरील घटनेमुळे मकरसंक्रांती सणाच्या दिवशीच हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.