यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील वढोदा ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सरपंच संदीप सोनवणे यांच्या प्रयत्नातुन गावापातळीवर स्वच्छता मोहीमेअंतर्गत कचरा संकलासाठी डस्बीन लोकापर्ण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नातुन व जिल्हा परिषद माजी गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन स्वच्छता मोहीमे अतंर्गत यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) व सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्या हस्ते कचरा संकलासाठी डस्बीनचे लोकार्पण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) व सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांच्या हस्ते स्वच्छतेच्या साहित्याचे ग्रामपंचायतच्या वतीने लोकार्पण करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे,उपसरपंच चौधरी,ग्रा.पं.सदस्य किरण सोनवणे,प्रतिभा सोनवणे,संगीता मालचे,धनराज सोनवणे,गोविंद सोनवणे,ग्रामसेवक व्हि.एल.पाटील,तंटामुक्ती समिती अध्यक्ष उत्तम सोनवणे,माजी सरपंच दिनकर सोनवणे, विकी सोनवणे,चेतन सोनवणे,लीलाधर सोनवणे,निलेश पाटील,चिंतामण भिल्ल,माजी उपसरपंच चौधरी,ग्राम रोजगार सेवक सरफराज तडवी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी तसेच गावातील नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.