यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथे संशयास्पदरित्या हातात लोखंडी सुरा व फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर यावल पोलीसांकडून कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील अट्रावल गावात संशयास्पदरित्या हातात लोखंडी सुरा आणि फायटर घेवून चार जण फिरत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी जयेश काशिनाथ भालेराव (वय-३०),समिर मुकेश देशमुख (वय-३०),रोहीत मधुकर लोखंडे (वय-२१) व विशाल चंद्रकांत भालेराव (वय-२१) रा.भालोद ता.यावल या चार जणांवर कारवाई केली.यात चौघांची तपासणी केली असता विशाल भालेराव याच्याकडे लोखंडी सुरा व फायटर आढळून आले.या प्रकरणी विशाल यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.
आहे.