Just another WordPress site

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्या वतीने नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना नियमित पिक कर्ज परतफेड हि एक संस्कृती विकसीत व्हावी तसेच शासनामार्फतच्या व्याज सवलत योजना व प्रोत्साहनपर मोबदला यांची सर्वसामान्य शेतकरी यांना माहिती देण्यासाठी बँकेने हा उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती यावल महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखा व्यवस्थापक आर.बी.हिंगणेकर यांनी दिली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते हे होते.प्रसंगी राकेश कोलते व प्रमुख पाहुणे भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या हस्ते नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे सन्मानपत्र व पुष्पगच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांच्या हितासाठी बँकेचे व्यवहार,शेतीसाठी कर्ज मिळवणे व नियमीत कर्ज भरण्या संदर्भात आपले मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे हिशोबनिस अविनाश सोनोने यांनी तर उपस्थितांचे आभार शाखेचे अधिकारी मयूर पवार यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी विक्रम धकाते यांनी केले आणि या प्रसंगी शाखेचे महेश खाचणे व भूषण महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांनी बँकेतर्फे झालेल्या या सन्मान बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.