Just another WordPress site

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबविण्यात यावा;

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-सम्पूर्ण महाराष्ट्रात १७ सप्टेंबर २२ ते २ ऑक्टोबर २२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.यामध्ये नागरिकांचे आपले सरकार,नागरी सेवा व वेब पोर्टलवरील १० सप्टेंबर पर्यंतच्या अर्जाचा जास्तीत जास्त निपटारा करून पंधरवडा यशस्वी करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.सातारा जिल्हा कार्यालयातील नियोजन भवनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.

शासन हे सर्वसामान्यांचे आहे.त्याचबरोबर शासन गतीने काम करीत आहे.सहाशेच्या आसपास लोककल्याणकारी शासन निर्णय काढण्यात आले आहेत.शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात रोज किती अर्जाचा निपटारा करण्यात आला याचा जिल्हास्तरावर जिल्हाधीकारी व तालुकास्तरावर प्रांताधिकारी यांनी आढावा घ्यावा.या पंधरवाड्यात जास्तीत जास्त अर्जाचा निपटारा होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा व त्यानुसार काम करावे.आपण लोकांचे सेवक असल्याची भावना ठेऊन जास्त वेळ काम करावे लागले तरी ते करण्याची तयारी ठेवा.अर्जांवर जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तात्काळ निर्णय घ्यायचा आहे.शासनाकडून याकरिता काही मदतीची गरज भासल्यास ती तात्काळ दिली जाईल अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल,निवासी उपजिल्हाधीकारी सुनील थोरवे,उपजिल्हाधिकारी(महसूल)प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी(महसूल)प्रशांत आवटे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधीकारी सुनील थोरवे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.