मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या दि.२५ मे २३ गुरुवार रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार असून बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे.सदरहू उद्या दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून दिले जाणार असल्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
यावर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी ७ लाख ९२ हजार ७८० विद्यार्थी तर ६ लाख ६४ हजार ४४१ विद्यार्थीनी अशा एकूण १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे.सदरील परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३१९५ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
बारावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC),दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in जाहीर करते.आपण आपला निकाल कसा पाहू शकता ?
MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा
Maharashtra HSC result 2023 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल त्यावर क्लिक करा.त्यानंतर रिझल्ट पेज ओपन होईल
या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे.ही माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला आपल्या स्क्रिनवर निकाल पाहता येईल.
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून ५७७६६ या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.