यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील किनगाव बु॥ ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
यानिमित्त तालुक्यातील किनगाव बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच निर्मला पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रमात गावातील सामाजीक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान ग्राम पंचायतीच्यावतीने करण्यात आला.यात माजी जिल्हा परिषद सदस्या रत्नाताई चंन्द्रकांत चौधरी,माजी ग्रामपंचायत सदस्या मदिना गुलशेर तडवी,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मायावती अरुण बियाणी,अश्विनी मनीष पाटील,कोकीळाबाई गोकुळ पाटील,नलिनी एकनाथ साळुंके,आशाबाई साहेबराव हिवराळे व सरुबाई धोंडू हिवराळे या महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.प्रसंगी मायावती बियाणी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची आठवण करून देतांना अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित कविता गायन केले तर अश्विनी पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयाने केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील रेखाताई नायदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.