पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्रकारास धमकीच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षकांना निवेदन
पत्रकाराला दिलेल्या धमकीचा सर्वच थरातून निषेध;
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यात मालोद व परसाडे या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान येथील तहसील कार्यालयात वृत्तांकन करीत असतांना येथील पत्रकार शेखर पटेल यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी दिल्याची घटना घडली.या घटनेच्या निषेधार्थ येथील पत्रकार संघाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,प्रांताधिकारी कैलास कडलक व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन देण्यात आले.या घटनेचा राज्यभरात सर्व थरातून निषेध व्यक्त केला आहे.
येथील पत्रकार शेखर पटेल हे नेहमीप्रमाणे तालुक्यातील मालोद व परसाडे या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान येथील तहसील कार्यालयात वृत्तांकन करीत असतांना एका पोलीस कर्मचाऱ्याने खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे का?जर दिली नसेल तर तुला फार महागात पडेल अशी धमकी दिली.या वृत्तसंकलनाबाबत पत्रकार शेखर पटेल यांनी रितसर तहसिलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची परवानगी घेतलेली होती हे विशेष.या धमकीच्या निषेधार्थ यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने याबाबतचे निवेदन फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,प्रांताधिकारी कैलास कडलक व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना देण्यात आले आहे.अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पत्रकार वर्गातून केली जात आहे.यावेळी पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील,भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष अय्युब.जी.पटेल,ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी,डी.बी.पाटील सर,शेखर पटेल,सुनील गावडे,तेजस यावलकर,राजेंद्र आढाळे,जीवन चौधरी,पराग सराफ,विकी वानखेडे,दीपक नेवे,समाधान पाटील,फिरोज तडवी,ज्ञानदेव मराठे,वासुदेव सरोदे,योगेश सोनवणे,समीर तडवी,निलेश पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.