Just another WordPress site

“महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस कलुषित करण्याचे सरकारकडून प्रयत्न”जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस खराब करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.मुंब्रा हा ठाण्यातला सर्वोत्तम भाग आहे.घोडबंदरपेक्षा चांगले मुंब्रा आहे.इथले वातावरण कलुषित करण्याचे काम सरकार करत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.सरकारलाच हे कलुषित वातावरण हवे आहे.मी तिथला आमदार असल्याने सरकार आणखी खुश आहे.मी जे आवाहन धर्मांतराविषयी केले होते त्यावर कुणीही काहीही प्रतिसाद दिलेला नाही असे कसे चालेल? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.एका धर्माला दुसऱ्या धर्माचा राक्षस दाखवून घाबरवले जात आहे असाही आरोप आव्हाड यांनी केला आहे.उत्तर प्रदेशातला एक अधिकारी म्हणतो की मुंब्र्यात ४०० मुलांचे धर्मांतर झाले आहे. मुंब्र्यातल्या पोलिसांना स्पष्टता द्यावी लागेल की असे काही झाले नाही.जर झाले असेल तर तुमच्या नजरेखालून मुलांचे धर्मांतर झाले तर पोलिसांना कसे कळले नाही? हिंदू समाजावर अविश्वास दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.४०० हिंदू धर्म परिवर्तन करतील अशी परिस्थिती नाही. पोलिसांना बातमीच कळत नाही हा पोलिसांचा अपमान आहे.हिंदूंचा आणि पोलिसांचा अपमान केला जातो आहे.मुस्लिमांकडे संशयाने पाहिले जात आहे.महाराष्ट्रावर ठपका म्हणून या तीन गोष्टी आहेत असेच म्हणता येईल असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रावर जर काळा डाग पडला असेल तर तो पुसला पाहिजे.ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे.महापालिका त्यांच्याकडे आहे.त्या महापालिकेत ते कधी काळी सभागृह नेते होते मात्र हे प्रकरण गांभीर्याने कुणी घेतलीच नाही.मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर करायला हवे होते की असे काहीही घडलेले नाही.मी आमदार आहे म्हणून बोंबलतोय.मुंब्रा बदनाम करुन तुम्ही किती घाणेरडे राजकारण करत आहात?मुंब्र्यात २५ टक्के हिंदू लोकही राहतात.माझे म्हणणे स्पष्ट आहे तुम्ही हिंदू मुलांना-मुलींना अपरिपक्व समजता का?त्यांना काही कळत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही हिंदू समाजाला बदनाम करताय का? त्यांना दाखवणार हा राक्षस आहे मी आहे म्हणून तू वाचलीस,वाचलास.राक्षस दाखवण्याचे हे प्रकार चाललेत ना? ते भयंकर आहेत.तुमच्यापुढे भयाचे राक्षस निर्माण करायचे आणि या संकटातून वाचायचे असेल तर आमची पूजा करा यासाठी सगळे चालले आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.लोकसभा निवडणूक होवो किंवा विधानसभा यांचा पराभव निश्चित आहे त्यापासून पळण्यासाठी उभे काय करायचे? तर धर्माचा राक्षस.एका धर्माला दुसऱ्या धर्माचा राक्षस दाखवून घाबरावयचे आणि तुम्ही आमच्याबरोबर राहा म्हणजे आम्हीच या राक्षसाला मारु शकतो असा राक्षसांचा खेळ सुरु आहे असाही गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.