Just another WordPress site

विरावली येथील अटल भुजल योजनेचे नालाखोलीकरणाचे काम अंतीम टप्प्यात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील विरावली गावात व परिसरासाठी भूजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा जळगाव यांचे वतीने शेतजमिनीच्या पाण्याची पातळी वाढवणे करीता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नानी व चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यांनी केंद्र सरकारकडून अटल भूजल योजनेअंतर्गत रिवाईज व्हीएसपी नालाखोलीकरण काम अंतीम टप्प्यात आले आहे.

याबाबत विरावली येथील माजी सरपंच व पालकमंत्री यांचे निकटवर्ती तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार सांडूसिंग पाटील (मुन्नाभाऊ ) यांनी सर्व शिंदे गटाच्या मान्यवरांकडुन मिळालेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याने अटल भुजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना वेग आला असुन सर्व कामेही अंतीम टप्प्यात पोहोचले आहेत.माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य तुषार (मुन्ना ) पाटील यांच्या सोबतीला विरावली गावच्या प्रथम नागरिक सरपंच कलीमा तडवी व ग्रामपंचायत उपसरपंच मनीषा ईश्वर पाटील याचे मार्गदर्शनखाली काम चालू आहे.संपुर्ण कामे ही गावातील ग्रामस्थांच्या सहभागातुन करण्यात येत आहे.सभापती तुषार पाटील व सरपंच कलीमा तडवी यांच्या पाठपुराव्याने अटल भूजल योजने अंतर्गत चालू वषाॅचा रिवाईज डब्लूएसपी करणेकरीता गावात ग्रामसभा घेवून रिचार्ज शाफ्ट व ट्रेच नाला खोलीकरण करणेकरिता आहोरात्र झटून काम करत आहे.या कामास अंतीम रूप देण्यासाठी ईश्वर पाटील,हमीद तडवी,नथू अडकमोल,कैलास उखा पाटील,राजेंद्र भास्कर पाटील,मेहबूब बलदार तडवी,रवींद्र दिगंबर पाटील,भागवत भीमसिंग पाटील,सुभान रमजान तडवी,मुकुंदा भालेराव,गफार तडवी,प्रवीण ठाणसिंग पाटील,सुपडू तडवी यांच्यासह ग्रामसेवक छाया पाटील आदींचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.