Just another WordPress site

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

भाजपा युवा मोर्चाच्या ‘गाव तिथ शाखा’ या पक्षबांधणी कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या शाखा उद्धघाटन नुकतेच करण्यात आले.

यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील किनगाव,आडगाव,सांगवी बुद्रुक व भालोद या गावांमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन पक्षाचे वरिष्ठ पदधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावल तालुक्यात भाजपाच्या पक्ष बांधणीच्या वेग आला असुन ‘गाव तिथ शाखा’ या कार्यक्रमाव्दारे तालुक्यात विविध गावामध्ये शाखा उद्धघाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले.याप्रसंगी भाजपा जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,कृउबाचे संचालक नारायण चौधरी,गणेश नेहेते,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस,राकेश फेगडे,भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जेनसिंग राजपूत,भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, उपाध्यक्ष अजय भालेराव,महेंद्र पाटील,विजय महाजन,भाजयुमो सोशल मीडियाचे हेमंत देवरे,तालुका उपाध्यक्ष शरद तायडे,भाजयुमो तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी,योगेश खेवलकर,शक्तिकेंद्र प्रमुख अनिल पाटील,राहुल पाटील,शाखा प्रमुख किनगाव-सुभाष पाटील,शाखा प्रमुख आडगाव -दीपक पाटील,शाखाप्रमुख भालोद -पप्पू परतने,शाखा प्रमुख सांगवी बु॥-धनराज पाटील तसेच भाजपा आणी युवा मोर्चाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.