“संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवनवीन बोलतात”-छगन भुजबळ यांची स्पष्ट भूमिका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात असून त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही टीका केली आहे.महात्मा गांधींना अख्ख जग नमन करते त्यामुळे अशा स्वरुपाचा आरोप सहन केला जाणार नाही त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.छगन भुजबळ म्हणाले की,मनोहर भिडेंवर आम्ही सुद्ध एक केस दाखल केली आहे.आमच्या बंगल्यातील आंबे खालल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्याप्रकरणी केस झाली होती.कोर्टात ती केस ढकलली जात आहे.ज्या पद्धतीने महात्मा फुलेंवर टीका करतात तसेच आता महात्मा गांधींवरही टीका करतात.माझी खात्री आहे की पंतप्रधान मोदी,अमित शाह यांनाही हे आवडणार नाही.महात्मा गांधींना अख्ख जग नमन करते.मी अनेक ठिकाणी गेलोय असा क्वचित एखादा देश असेल जिथे महात्मा गांधीचा पुतळा नाही.महात्मा गांधींच्या विचारसणीला मानले जाते,आपलेसे केले जाते त्या महात्मा गांधींवर किती गलिच्छ स्वरुपाची टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे. त्यांच्यासोबत जाणे हे राजकारणाच्यादृष्टीनेही आत्मघातकी आहे.महात्मा गांधींना अशा रितीने बोलले तर देशातीलच नाहीतर गुजरातमधील कोणताच बांधव-भगिनी सहन करील का? म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवनवीन बोलतात असेही छगन भुजबळ म्हणाले.
???????????????? डोंगर कठोरा गावातील तलाठी लोकसेवक मन मिळाऊ स्वभाव व कामात तत्पर राहणारे आमचे मित्र वसीम तडवी यांचा आज दि.३० जुलै वाढदिवस ????????????????त्यानिमित्ताने पोलीस नायक परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ???????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक (महाराष्ट्र राज्य)……………
संभाजी भिडे,निशांदसिंह जोध,अविनाश जोध व कार्यक्रमाच्या इतर आयोजकांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि १५३ (३), ५००, ५०५(२),३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महापुरूषांविषयी वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविणे,विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविणारे भाष्य करणे आणि महापुरूषांची बदनामी करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते असे विधान केले आहे.तसेच मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते.करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत व मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असे संभाजी भिडे म्हणाले होते.