Just another WordPress site

जामुन झिरा या आदिवासी पाड्यावर वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.९ सप्टेंबर २३ शनिवार

तालुक्यातील जामुन झिरा या आदिवासी पाड्यावर काल दि.८ सप्टेंबर शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्दघाटन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे याच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी आदिवासी बांधवानी शिक्षणाची कास धरावी तसेच वंचित बहुजन आघाडी आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत करणारा त्याचबरोबर शोषित,पिडीत,शेतकरी,कामगार,वंचित सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवुन देणारा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांनी आदिवासी बांधवांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक होण्याचे आवाहन केले.प्रसंगी साहिल तडवी,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे व भुषण साळुंके यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले.यावेळी बाबुलाल पटेल,यावल तालुका महासचिव राजेश गवळी,बिलालसिंग बारेला,शरद अडकमोल,संतोष तायडे,बिलसिंग पवार,कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदळे,बाबुलाल पटेल,प्रतिभाताई कोळी,रोहन निकम,भूषण भालेराव,रोहित वानखेडे,अमोल भालेराव,महेंद्र सोनवणे,अक्षय साळुंके,गोरख साळुंके,भानुदास महाजन,गौतम सपकाळे,भावडू पाटील,बळीराम कोळी,किरण साळवे,बुद्धभूषण तायडे,शीलवान अडकमोल,महेंद्र अडकमोल,जामुनझीरा शाखा अध्यक्ष नरसिंग बारेला,जग्गु बारेला,प्यारासिंग बारेला,संभासिंग बारेला,आसाराम बारेला,रामदेवसिंग बारेला,किरण पावरा,हरसिंग बारेला,रेंजला बारेला,रमेश जाधव,हमिद तडवी,शफि खान,तुराब तडवी आदि पदाधिकारी व जामुन झिरा पाड्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.