यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार
लग्न होत नाही या नैराश्येतुन कष्टकरी वृद्ध आई वडिलांंचा आधारस्तंभ व तिन बहीणींच्या एकुलत्या एक भाऊ असलेल्या अविवाहीत तरुणाने टोकाचे पाऊल उचलत दारूच्या व्यसनामुळे आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील डोणगाव येथील अविवाहित तरुण बळीराम अरूण पाटील वय ३७ वर्ष या अविवाहीत तरूणाने दि.२४ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याच्या एंगलता साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.सदरील तरूण हा अविवाहीत असल्याने त्यास दारूचे व्यसन जडल्याची माहिती समोर आली असुन बळीराम पाटील हे अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा तसेच तीन बहिणींचा भाऊ होता.यावलच्या ग्रामीण रुग्णालयात बळीराम पाटील या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी केली.सदरील घटनेबाबत विवेक धनराज पाटील यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान व पोलीस करीत आहेत.