यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ ऑक्टोबर शनिवार
येथील बोरावल गेट परिसरात काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी चहा पित असतांना झालेल्या थट्टा मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात प्रभाकर आनंदा धनगर वय-५५ वर्षे हे जखमी झाले होते.सदरहू त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांची प्रकृती
बिघडल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते.परंतु तेथे उपचार सुरू असतांना काल रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले असून सदरील घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील बोरावल गेट या गजबजलेल्या परिसरात काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील रहिवाशी प्रभाकर आनंदा धनगर वय ५५ वर्ष हे चहाच्या स्टॉलवर बसलेले होते.सदरहू या ठिकाणी उपस्थितांमध्ये थट्टा मस्करी सुरू होते.यातूनच रामा केशव ढाके राहणार व्यास नगर या व्यक्तीने थट्टा मस्करी चालु असतांना त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान प्रभाकर धनगर हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु पुढील उपचार सुरू असतांना काल रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले असून सदरील घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान याच प्रकरणातील दुसरा व्यक्ती रामा केशव ढाके हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.सदरील घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे.