Just another WordPress site

यावल पोलीसांकडून मोटार सायकल चोरीचे रॅकेट उध्वस्त;१८ आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.६ ऑक्टोबर २३ सोमवार

येथील पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दि.१६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.यावल पोलीसांनी केलेल्या या मोठ्या मोटरसायकल चोरी पर्दाफास प्रकरणात आंतरराज्य टोळीशी लागेबांधे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,यावल पोलीस ठाण्यात मागील सप्टेंबर महीन्यात शहरातील कुंभारटेकडी परिसरातुन चोरीस गेलेल्या ट्रेक्टर चोरीच्या गुन्ह्याचा पोलीसांकडून शोध घेतला जात असतांना पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळीच हाती लागल्याने पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी लावलेल्या मोटरसायकल चोरीच्या तपासात १३ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.यात पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणुन अर्जुन सुरेश कुंभार,अशरफ उर्फ गोलु कलींदर तडवी,जावेद खान अशरफ खान,सागर उर्फ उमेश जितेन्द्र सपकाळे,देविदास उर्फ साहिल तलेश बारसे,विशाल दिलीप वाणी,विनोद दौलत कुंभार,उमेश झग्ग्रु घारू,संजय भगवान भोई,हर्षल सदांनद गजरे,रविन्द्र सुरेश कुंभार,आकाश राजु कुंभार,सुरेश आनंदा कुंभार,राजेश कडू महाजन,सरफराज समशेर तडवी,जावेद खान नजीर खान सर्व राहणार यावल आणी रविन्द्र पंढरी कोळी राहणार दहिगाव तालुका यावल यांना अटक करण्यात आली असुन या सर्व संशयीत आरोपींना पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.वाळके यांनी एक दिवस पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश दिले आहे.सदरहू या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांनी राज्यासह मध्यप्रदेश आणी गुजरात मोटरसायकल जप्त केल्या असुन या मोटरसायकल चोरीच्या वाहन प्रकरणात आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोटार सायकल चोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून यानिमित्ताने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.