Just another WordPress site

यावल पोलीस ठाण्यातील दोघांचा पोलीस महानिरिक्षकांच्या हस्ते सन्मान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ नोव्हेंबर २३ बुधवार

येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पोलीस कर्मचारी शामकांत धनगर यांनी गुन्हे शोधकामी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन नुकताच सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील किनगाव येथे मागील वर्षी अनैतिक संबधातुन भिमराव सोनवणे नावाच्या व्यक्तिचा निर्दयीपणे खुन करण्यात आला होता या अत्यंत गुंतागुतीच्या गुन्ह्याचा शोध लावण्याकामी यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलिस शिपाई शामकांत धनगर यांनी योग्य दिशेने तपास करीत गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक केली होती.सदरील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.बि.जी.शेखर यांच्या हस्ते जळगाव येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात नुकताच प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.जळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पोलीस कर्मचारी शामकांत धनगर यांनी गुन्हे शोधकामी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे,पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक विनोदकुमार गोसावी,पोलिस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभीनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.