Just another WordPress site

महीन्याभरात रस्त्याचे काम पुर्ण करण्याच्या लिखित आश्वासनांतर आंदोलन कर्त्यांचे आंदोलन स्थगित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ डिसेंबर २३ बुधवार

तालुक्यातील अकलुद ते दुसखेडा या मार्गावरील रस्त्याचे काम व जवळपास दिड कोटींचे निधी मंजुर झालेले असतांना संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या वेळ काढुपणामुळे मागील तिन वर्षापासुन सदरच्या रस्त्याचे काम हे अपुर्ण अवस्थेत असल्याने या रस्त्याशी जोडलेल्या जवळपास विस गावांच्या नागरीकांना वाहनांचे होणाऱ्या अपघातांसह अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील,राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली दुसखेडा व परिसरातील विविध गावांच्या सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे चार तास ठीय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे.एस.तडवी व बांधकाम अभीयंता अजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी तडवी यांनी आंदोलनकर्त्यांना एक महीन्याच्या आत संपुर्ण रस्त्याचे काम पुर्ण होइल असे लिखित पत्राद्वारे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

सदरील आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील,आदीवासी विभागाचे एम.बी.तडवी,वसंत पाटील,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी,मोहसीन खान,आबिद कच्छी,माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक,बापु जासुद,समाधान पाटील,अन्वर खाटिक,कामराज घारू,ललित पाटील,हाजी युसुफ शेख,राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त,दुसखेडा व ईतर परिसरातील कासवा गावांचे सरपंच राहुल इंगळे,सदस्य श्रीराम सपकाळे,दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच विवेक सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य महेन्द्र बाऱ्हे,याकुब तडवी,विनोद पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थांनी या ठीय्या आंदोलनात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.