Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Thursday, May 14, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

मुलांमध्ये चिडवण्यातून वसतिगृहात विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्याचा चाकू हल्ला !!

क्राईममहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Dec 28, 2024 0

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ डिसेंबर २४ शनिवार

विद्यार्थी वसतिगृहात वारंवार छेड काढणाऱ्या एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्याच समवयस्क विद्यार्थ्याने चाकूने पोटात भोसकल्याची धक्कादायक घटना अकलूज येथे घडली असून या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वसतिगृहाच्या अधीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार हल्लेखोर मुलाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.विजय विद्यार्थी वसतिगृहात घडलेल्या या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,नाताळची सुट्टी असल्यामुळे सर्व मुले वसतिगृहात होती व रात्री सर्व मुले जेवण आणि अभ्यास करून आपापल्या खोलीत झोपली होती यातील जखमी विद्यार्थी या वसतिगृहात एका खोलीत झोपला होता.वसतिगृह अधीक्षक आपल्या खोलीत झोपले होते तेव्हा पहाटे तीनच्या सुमारास जखमी मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत वसतिगृह अधीक्षकांच्या खोलीत आला व त्याने आपणांस कोणीतरी व्यक्तीने चाकूने भोसकल्याचे सांगितले.त्याला तत्काळ अकलूजच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबतची माहिती वसतिगृह अधीक्षकांनी संस्थेच्या सचिवांना आणि पोलिसांना कळविली.

दरम्यान दुपारी एकच्या सुमारास वसतिगृहातून एक मुलगा पळून जात असतांना त्यास पकडण्यात आले.चौकशी केली असता त्याने आपणच जखमी मुलास चाकूने भोसकल्याचे कबूल केले.जखमी मुलगा हा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वसतिगृहात येता जाता इतर मुलांच्या समोर त्याला ‘बेस्ट टॉयलेट सर्व्हिस’ असे बोलून छेडायचा त्यामुळे संशयित हल्लेखोर त्याच्यावर चिडून होता मात्र त्याने याबद्दल विद्यार्थी वसतिगृह प्रशासनाकडे एकदाही तक्रार नोंदविली नव्हती.त्याने आपणांस त्रास देणाऱ्या मुलाचा काटा काढण्याचा डाव रचला व त्याचाच भाग म्हणून त्याने गुपचूपपणे आपल्या खोलीत चाकू आणून ठेवला.जखमी मुलगा आपल्या खोलीत एकटाच झोपण्याची संधी साधून हल्लेखोर मुलाने पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या खोलीत घुसून जखमी मुलावर तो झोपेत असताना चाकूने थेट हल्ला केला.पोटात चाकू भोसकला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे वसतिगृह अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

बदलापूर पुन्हा हादरले !! मैत्रिणीने मद्य पाजून रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार !!

Next Post

“प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…” !! सुषमा अंधारेंचे विधान चर्चेत !!

You might also like More from author
क्राईम

पिंपरुड शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !!…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

क्राईम

चिंचोली येथील वयोवृद्ध आईच्या एकूलत्या एक मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !!

ऑनलाईन फसवणूक घडामोडी विशेष

बारामतीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघड !! ₹१.३० कोटींची फसवणुकीतील ₹ ४४ लाख रक्कम…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारच्या “भारत विभूषण” पुरस्काराने सन्मानित !!
  • बारामती सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात गंभीर अनागोंदी !! रुग्णांच्या जीवाशी सुरू आहे खेळ? !!
  • पिंपरुड शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !! सुरक्षिततेकडे दुर्लक्ष जिवावर बेतले !! डमी इलेक्ट्रिक पोल काढतांना घडली दुर्दैवी घटना !!
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या तालुका अध्यक्षपदी किरण भवरे यांची निवड !!
  • किनगाव निवासी पब्लिक स्कूलची दहावी परीक्षेतील १०० टक्के निकालाची परंपरा कायम !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.