Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, May 15, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“..मात्र आत्तापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही” !! लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य !!

महाराष्ट्र घडामोडी विशेषमहाराष्ट्र विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Feb 13, 2025 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली असून महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे व ही योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हे देखील स्पष्ट केले तसेच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्त्वाच विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार,ही योजना बंद करणार,ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही.ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत.मी हेदेखील अधिकाऱ्यांना सांगितले की रिव्हर्स गणित मांडा की आपली प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे ? किती करु शकतो ? २५ हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून आणता येईल का ? याचा विचार आम्ही करतो आहोत.इतर कुठल्या योजनांच्या माध्यमांतून निधी उभा राहिल हे आम्ही पाहतो आहोत.महसुली तूट वाढते आहे म्हणून भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये आम्हाला जायचे नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन थाळी आणि शिवभोजन थाळी या योजनाही बंद करण्याचे कारण नाही.अनेकदा बातम्या आल्यावर आम्हाला कळते की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत.परवाच गयेला ट्रेन्स गेल्या,अयोध्येला ट्रेन्स गेल्या.कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही.या योजनांच्या संदर्भात आम्ही आढावा घेणार आहोत.लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला आहे.साधारणतः १० लाख ते १५ लाख एवढी ही संख्या जाऊ शकते त्यातल्या अनेक बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे सोडणे सुरु केले आहे.आम्ही ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना आम्ही यापुढे योजनेचा लाभ देणार नाही कारण आम्ही यासाठी कॅगला उत्तरदायी आहोत कारण कॅगकडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागते अशा प्रकारे यापुढे घडू नये म्हणून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही मात्र आत्तापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही.तो निधी त्यांच्याकडेच राहिल मात्र पात्र महिलांनाच पैसे गेले पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मंत्रालयात काही लोक पर्मनंट पीए आहेत.काही लोक चांगलेही आहेत.काही लोकांना पीएचे काम करतांना दलालीची सवय लागली त्यामुळे अशा दलालांना बाजूला केले पाहिजे म्हणून मी सांगितले की आम्ही सगळी पडताळणी करु आणि त्यानंतर त्या संदर्भातली मान्यता देऊ असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तसेच मी अधिकाऱ्यांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे.सरकारी कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असली पाहिजे.तसेच अधिकारी कुठल्या वेळेस उपलब्ध असतील ? हे देखील समजले पाहिजे अशा सात गोष्टी मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्त समूहाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती यावेळी त्यांची मुलाखत पार पडली या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

डोंगर कठोरा येथे श्रीमद रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्यास प्रारंभ

Next Post

बाळाच्या बारशाआधीच सख्खे भाऊ गाडीसकट विहिरीत पडल्याने बाळाचे पितृछत्र हरपले !! एकाच घरातील तिघांचा मृत्यू !!

You might also like More from author
महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरणाचा भाजपाचा खटाटोप कशासाठी ? समाजात संतप्त भावना तर…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी पवन यादवचा व्हिडीओ व्हायरल !! राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !!

पक्ष संघटन विशेष घडामोडी

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा संपन्न…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • फैजपूर विभागात आगामी उत्सवांच्या नियोजनासाठी पोलीस पाटलांची आढावा बैठक संपन्न !!
  • रावेर विधानसभा शिंदे शिवसेना गट युवा सेना संपर्क प्रमुखपदी यावलचे राहुल बारी यांची नियुक्ती !!
  • पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला यश !! पोलीसांच्या गृहकर्ज अग्रिम लोनसाठी १७कोटी रुपये मंजूर !!
  • यावल नगराध्यक्षाच्या प्रयत्नातून हतनुर धरणातील पाणी साठवण तलावात सोडण्यात आल्याने पाणीप्रश्न मिटला !!
  • पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारच्या “भारत विभूषण” पुरस्काराने सन्मानित !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.