Just another WordPress site

यावल शहरात गुटखाबंदीची पायमल्ली …..सरकारी कार्यालयांबाहेर व गल्ली बोळातील दुकानांवर खुलेआम विक्री !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ जुलै २६ गुरुवार

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात भेसळयुक्त दुध,सर्वाच न्यायालयाने बंदी घातलेला गुटखा,सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही यावल शहरासह तालुक्यात गुटखा बंदी नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे शहरातील सार्वजनिक ठिकाण,गल्ली बोळातील परिसर,सरकारी कार्यालयांच्या बाहेरील भाग तसेच गर्दीच्या चौकांमध्ये गुटखा खुलेआम विक्री होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शासनाकडून गुटखा बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी वेळोवेळी कठोर आदेश,छापेमारी मोहीम व जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.मात्र यावल शहरात परिस्थिती वेगळीच दिसून येत असून अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे अल्पवयीन युवक व विद्यार्थी वर्गामध्ये देखील गुटख्याचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनला आहे.

शहरातील काही पानटपऱ्या,गल्ली बोळातील किराणा दुकाने तसेच हातगाड्यांवर बंदी असलेला गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.अशा प्रकारे शहरात व तालुक्यात अन्न व औषद्य प्रशासना विभागाचे आयुक्त व सिंघम अधिकारी म्हणुन ओळख निर्माण करणारे तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा दरारा राज्यात सुरु असतांना नेमकी गुटखाबंदी खरच आहे का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देणाऱ्या गुटक्याला शासनाने बंदी लागू केली होती मात्र जिल्ह्यातील संबंधितअन्न व औषद्य विभागाच्या दुर्लक्षामुळे विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी कारवाई होत असली तरी ती केवळ दिखावूपुरती असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने केवळ लहान विक्रेत्यांवर नव्हे तर या अवैध व्यवसायामागील मुख्य पुरवठादार व आका यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.यावल शहरासह तालुक्यात गुटखा विक्री थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,नियमित छापेमारी करावी तसेच युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.आता तरी पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.