Just another WordPress site

“बाळासाहेब आणि तुमचे रक्ताचे नाते मग….” !! छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१५ जून २४ शनिवार

लोकसभा निवडणूक झाल्यापासून आणि खासकरुन महाराष्ट्रातले निकाल समोर आल्यापासून छगन भुजबळ यांचे नाव चांगलेच चर्चेत आले असून छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत जी विधाने केली आहेत त्यावरुन ते नाराज झाले आहेत का ? या चर्चा रंगत आहेत.अशात छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली होती.बाळासाहेब ठाकरेंना ज्या माणसाने अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असे राज ठाकरे भाषणात म्हणाले होते त्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंना छगन भुजबळांनी महत्त्वाचा सवाल केला आहे.मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली.बाळासाहेबांनी माझ्यावर टीका केली. माझ्यासमोर जी फाईल आली ती फाईल होम डिपार्टमेंट म्हणून माझ्याकडे आली त्याआधी अगोदर शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला आम्ही सांगितले होते की,श्रीकृष्ण कमिटीचा जो अहवाल आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करु त्यानंतर मी कारवाई केली होती व माझ्यापुढे तेव्हा मार्गच नव्हता असे छगन भुजबळ म्हणाले तसेच राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

मी राज ठाकरेंना विचारु इच्छितो की,राज ठाकरे लहान होते तेव्हा शाळेतून आले नाहीत की बाळासाहेब विचारायचे राजा अजून कसा आला नाही ? माँ विचारायच्या राजा का आला नाही ? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब हे दोघेही जेवत नव्हते हेच रक्ताचे नाते आहे.माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले.मंडल आयोग किंवा इतर कशावरुन पण राज ठाकरेंचे काय ? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचे होते की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे.मग तुम्ही वेगळे व्हायचे कारण काय ? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना.मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत ? बाळासाहेबांना किती दुःख झाले असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत होतो त्याने असे करावे हे त्यांना वाटलेच असेल असे भुजबळ म्हणाले.टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी हे भाष्य केले आहे.यापुढे भुजबळ म्हणाले,राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला तो पुढचा भाग.शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. एकमेकांवर टीका झाली.शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली.बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितले असते की हे नाही तर ते काम कर.त्यांनी (राज ठाकरे) ऐकायचे होते.राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका.राग हा त्या क्षणापुरता असतो,राग शांत झाला की मन बदलते.दोघांनीही ऐकले पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतल्याचे भुजबळ यांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.