जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जुलै २४ सोमवार
येथील यावल वनविभागाच्यावतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम वनविभागतर्फे शारदाश्रम विद्यालय शिवकॉलनी कोल्हे नगर पश्चिम जळगाव येथे राबविण्यात आला.सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी,यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख,रविन्द्र फालक अध्यक्ष वन्यजीव संस्था,राजुमामा भोळे आमदार जळगांव शहर,राजेंद्र नन्नवरे सदस्य केंद्रीय पर्यवरण सक्षमीकरण समिती भारत सरकार,भरत अमळकर अध्यक्ष केशव स्मृती प्रतिष्ठान उपस्थित होते.दरम्यान जळगांव व यावल वनविभाग तसेच अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रम पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे,स्कायनेटचे उदय पाटील,शिवराज पाटील,संजीव साटले,दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष इंगळे,सचिव अमळकर,समीर साने आणि १५० व्याघ्रदूतांच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपस्थित राहुन कार्यक्रम राबविण्यात आला. सदर वाघ्र दिनानिमित्त रविवारी सकाळी शारदाश्रम विद्यालय शिव कॉलनी कोल्हे नगर पश्चिम जळगांव येथून मान्यवर व १५० व्याघ्रदूतांच्या उपस्थितीत २ दिवसीय जनजागृती रॅली निमित्त रॅली काढण्यात आली.या दोन दिवसीय रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.त्यानंतर पहिल्या दिवसाच्या जनजागृतीपर नशिराबाद, भुसावळ,मुक्ताईनगर,डोलरखेडा,वायला,सुकळी,दुई व परिसरातील गावांमध्ये पथनाटय सादरीकरण,मानवी वाघ,माहिती पत्रकाचे वाटप करुन वाघ वाचवा,जंगल वाचवाच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.