यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार
तालुक्यातील कोसगाव येथील मूळ रहिवासी विजय भावलाल पाटील (हल्ली मुक्काम पुणे) यांची मुलगी कु.नंदिनी विजय पाटील हिची आयर्लंड येथील मास्टर इन बायोलॉजिकल अँड बायो मोलोकोलर सायन्स इन युनिव्हर्सिटी कॉलेज दुब्लीन आयर्लंड येथे एम.एस बायोटेक्नॉलॉजी शिक्षणासाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे कोसगाव येथील पाटील वाडा व तिचे सर्व नातेवाईक यांनी नंदिनीचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कुमारी नंदिनी पाटील ही पुणे येथे याआधी बीएससी ब्लेंडेडसाठी तिने उच्च शिक्षण घेतले असून तिला तिचे वर्ग शिक्षक आणि आई-वडील तसेच तिचे काका डॉ.कैलास पाटील एमडी आयुर्वेद भुसावळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी गुजर समाजातून संपूर्ण कौतुक होत असून तिच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,केन्द्रीय मंत्री युवा क्रिडामंत्री रक्षाताई खडसे,गुजर समाजाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पाटील खर्डीकर,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती हिरालाल चौधरी,कमलाकर पाटील मनवेल,पत्रकार अरुण पाटील यांच्यासह आदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सदरहू नंदिनी पाटील ही मनवेल विकास सोसायटीची माजी चेअरमन कमलाकर हिरामण पाटील यांची नात (मुलीची मुलगी) तसेच सेवानिवृत्त रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी भाऊलाल वासुदेव पाटील कोसगावकर यांची नात आहे.