बॅग तपासायला हरकत नाही,माझे मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे.माझी बॅग तपासल्याबद्दल माझा आक्षेप नाही पण प्रकारे माझी बॅग तपासली तशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदी यांची तपासली जाते आहे का ? मी आज त्या अधिकाऱ्यांना विचारला की त्यांनी आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या त्यावेळी ते म्हणाले तुमचीच पहिली बॅग तपासली आहे याचा अर्थ पहिला गिऱ्हाईक मीच होतो अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.दरम्यान औसा येथील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे सोलापूरच्या दिशेने जायचा निघाले होते मात्र पंतप्रधान मोदी सोलापूरला येत असल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परावनगी देण्यात आली नाही यावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीकास्र सोडले.मी औसावरुन इकडे यायला निघालो होतो.हेलिकॉप्टरमध्ये बसलो पण हेलिकॉप्टर उडायला तयार नव्हते.मी कारण विचारले तर त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी सोलापूरला येत आहेत ते पोहोचल्याशिवाय आपल्याला उड्डान करता येणार नाही.ही कुठली बेबंदशाही आहे.ही लोकशाहीची थट्टा आहे. मला जो कायदा आहे तो त्यांनाही लागू असायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.