पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काळाखडक येथे अंमली पदार्थ विरोधी पथक हे गस्त घालत असतांना पथकातील पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांना माहिती मिळाली की दोन संशयित सुरज पंडित पवार आणि हफिजअली मेहबूबअली यांच्याकडे गांजा आहे.सदरहू त्यांना ताब्यात घेऊन सुरजच्या घरी तीन किलो ७२२ ग्रॅम गांजा व दोन मोबाईल देखील मिळाले.तर दुसऱ्या कारवाईमध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला संशयितरित्या मोहिनी जाधव ही महिला थांबली होती.मोहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.मोहिनीच्या घरी देखील चार किलो गांजा पोलिसांना मिळाला.दोन्ही कारवाई मध्ये सुमारे नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे.ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.