Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Thursday, August 13, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवेवर गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती !!

राजकीय घडामोडी विशेषमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Jan 25, 2025 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ जानेवारी २५ शनिवार

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती व ते नाराजी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव घेत थेट टीका देखील केली होती.मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमके काय चाललय ? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.दरम्यान काल शुक्रवारी (२४ जानेवारी) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते व यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले.शाह यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारची खुर्ची दिली.भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान शाह यांनी केलेल्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.दरम्यान यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून मालेगावमधील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता,तो शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे तिथे सर्वच पक्षांचे लोक होते असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.तसेच “त्या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना खुर्ची दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही” असेही महाजन म्हणाले.

गिरीश महाजन म्हणाले,मला वाटते तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता.तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वच मंत्र्यांना व आमदारांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते.माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते.छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत,हे वरिष्ठ नेते अनेक वर्षे मंत्री देखील राहिले आहेत व सहाजिकच त्यांना खुर्ची देण्यात गैर काहीच नाही.तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात मात्र मी त्यावर काही बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील.भुजबळ आमच्या वरिष्ठांशी बोलतील.देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुठल्यातरी नेत्याशी बोलतील असे गिरीश महाजन म्हणाले.दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी अलीकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली होती त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

ऐकावे ते नवलच : नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ !!

Next Post

‘शेतकरी सगळ्यात मूर्ख’ !! वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे अजब विधान !!

You might also like More from author
राजकीय घडामोडी विशेष

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन आहे” !!…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

बँक खाते पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर ८१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून…

राजकीय घडामोडी विशेष

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर !! शिंदे गटाच्या…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल-भुसावळ राज्य महामार्ग खड्डेमय रस्त्यामुळे देतोय अपघातास आमंत्रण !!
  • भाऊ बहिणीच्या जिव्हाळयाचा अतूट प्रेमाचे बंधन साजरे करण्यास पोस्ट ऑफिस सज्ज !! रक्षाबंधननिमित्ताने पोस्ट ऑफिसची पार्सल योजनेची भेट !!
  • सन २०२४-२५ पर्यंत टी.ई.टी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नाव पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावे !! महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी !!
  • भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या जळगाव पुर्व जिल्हाध्यक्षपदी नारायण चौधरी यांची निवड !!
  • आदिवासी एकता मंच या आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या संघटनेतर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.